Breaking News

पोलिसांकडून विद्यार्थ्यांना वह्यावाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी पोलीस ठाणे व ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या कांबे व चांभार्ली येथील शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम व विद्यार्थ्यांना पोलीस काका आणि पोलीस दीदी संकल्पनेबाबत माहिती देण्यात आली. रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे व ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कांबे व चांभार्लीं जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप कार्यक्रम राबविण्यात आला. या वेळी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे महाराष्ट्र सचिव गणेश थोरवे, रायगड जिल्हा अध्यक्ष सागर काशिनाथ कुरंगळे, पोलीस शिपाई जाधव मॅडम, पोलीस नाईक विशाल झावरे, सचिन गोंधळी, रोशन गोंधळी, मयूर डुकरे, सुशील कुरंगळे, सुनील कुरंगळे, मनिष कुरंगळे, बाळकृष्ण कुरंगळे, सचिन कुरंगळे, मनिष कुरंगळे, जीवन कुरंगळे आदी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply