खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि.13) स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पाडण्यात आले. महाविद्यालय प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा नायर उपस्थित होत्या. याचबरोबर अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्षच्या समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे, सर्व प्राध्यापक वृंद, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या वेळी दोन्ही प्राचार्यांनी चांगू काना ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. प्रा. महेश धायगुंडे यांनी स्व. चांगू काना ठाकूर यांच्या कारकिर्दीबद्दल व त्यांनी केलेल्या धोरणाबद्दल विशेष माहिती दिली. सुत्रसंचालन प्रा. रोहित यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यानी यशस्वीरित्या पार पाडली.