Breaking News

कर्जतचे पाली-भूतीवली धरण ओव्हरफ्लो

कर्जत : बातमीदार

पाटबंधारे विभागाने बांधलेले कर्जत तालुक्यातील  पाली-भूतीवली धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. मात्र कालवे पूर्ण झाले नसल्याने धरणाचे पाणी शेतीसाठी सोडले जात नाही. दरम्यान, या धरणावर जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. कर्जत-नेरळ रेल्वेपट्ट्यातील सुमारे 1100 हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे या प्रमुख हेतूने पाटबंधारे विभागाने भिवपूरी रोड रेल्वेस्थानकासमोर पाली-भूतीवली धरण उभारले आहेम मात्र कालवे खोदण्यात आले नसल्यामुळे आजतागत धरणाचे पाणी शेतीसाठी देण्यात आलेले नाही. परिणामी 35 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक राहते. या वर्षी पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी अवघ्या दहा दिवसांत धरणातील जलाशयाने आपली पातळी गाठली. सकाळी धरण ओव्हरफ्लो झाले. तो अनुभव धरणाच्या खाली असलेल्या आसल, भूतीवली या गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी अनुभवला. तसेच  धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाण्यासोबत खाली येणारे मासे पकडण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ जमले होते. दरम्यान, पाली-भूतीवली धरणावर वर्षा सहलीसाठी आलेल्या  किमान 15 जणांचा जलाशयात बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे या धरणाच्या परिसरात पर्यटनासाठी येण्यास पाटबंधारे विभाग आणि नेरळ पोलिसांनी बंदी घातली आहे.

 

पाली भूतीवली धरणात बुडून यापूर्वी अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. ते लक्षात घेऊन पर्यटकांना पाली भूतीवली धरणाच्या परिसरात जाण्यास बंदी घातली आहे.

-राजेंद्र तेंडुलकर, पोलीस निरीक्षक, नेरळ पोलीस ठाणे

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply