Breaking News

39 प्रभागांतील मतदार संख्येत बदल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

काही दिवसांपूर्वी आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय जाहीर करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी शनिवारी अंतिम करण्यात आली आहे. यात प्रारूप यादीच जाहीर केलेली 8,45,524 मतदार संख्या कायम ठेवण्यात आली आहे. 41 प्रभागांपैकी  प्रभाग क्रमांक 1 व 21 हे 2 प्रभाग वगळता इतर 39 प्रभागांतील मतदारांची संख्या बदलली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिका प्रशासनाने प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती घेण्यासाठी 1 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. नंतर मुदतवाढ देत 3 जुलैपर्यंत हरकती घेण्यात आल्या. त्यानुसार 1842 हरकती घेण्यात आल्या होत्या. नियमानुसार हरकतींवर सुनावणी घेतली जात नाही, मात्र हरकतीनुसार स्थळपाहणी पालिकेमार्फत करण्यात आली व त्यानुसार पालिकेने दुरुस्ती करून अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला होता. त्यानंतर शनिवारी पालिकेने अतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार बहुतांश प्रभागात मतदारसंख्या बदलली आहे. मात्र एकूण मतदार संख्या कायम आहे.

पालिका प्रशासनाने वेळोवेळी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही केली आहे. प्रभाग निहाय मतदार याद्याही अंतिम करण्यात आल्या आहेत, पण शासन व निवडणूक आयोग ज्या पध्दतीने आदेश देतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply