Breaking News

लुईस हॅमिल्टन सहाव्यांदा जगज्जेता!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनला अमेरिकन ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीत दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले तरी त्याने सहाव्यांदा जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले. यासह

हॅमिल्टनने मायकेल शूमाकरच्या सात जगज्जेतेपदांच्या विक्रमाच्या दिशेने कूच केली आहे.

मर्सिडिझच्या वाल्टेरी बोट्टासने सुरुवातीपासूनच शर्यतीवर नियंत्रण मिळवत विजेतेपद पटकाविले. त्याचे हे या मोसमातील चौथे, तर कारकिर्दीतील सातवे जेतेपद आहे. ब्रिटनच्या हॅमिल्टनने पाचव्या क्रमांकापासून शर्यतीला सुरुवात केली, मात्र फिनलँडच्या बोट्टासचा झंझावात तो रोखू शकला नाही. हॅमिल्टनने दोन वेळा आघाडी घेतली होती, पण तीन फेर्‍या शिल्लक असताना बोट्टासने पुन्हा एकदा आघाडी घेत विजेतेपद संपादन केले. रेड बुलच्या मॅक्स वेस्ट्रापेनने तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली.

हॅमिल्टनने शर्यतीतून 18 गुणांची कमाई करीत एकूण 381 गुणांसह जगज्जेतेपद पटकावले. 2019च्या अद्याप दोन शर्यती (ब्राझील व अबूधाबी ग्रां. प्रि.) शिल्लक असल्या तरी दुसर्‍या क्रमांकावरील बोट्टासला (314 गुण) हॅमिल्टनशी बरोबरी करता येणार नाही.

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

आयडियल सेंटर डिजिटल लॅबचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये सोमवारी (दि.१५) …

Leave a Reply