Breaking News

जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिींग स्पर्धेमध्ये अथर्व, कुणाल, अक्षय विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्त
जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पनवेल येथे नुकतीच झाली. या स्पर्धेत सब ज्युनिअर गटात पेण येथील संसारे फिटनेसचा कुमार अथर्व लोधी, ज्युनिअर स्पर्धेत कुमार कुणाल पिंगळे (बीवायएफसी, जिम खोपोली)आणि सीनिअर पुरुष गटात अक्षय शांनमुगम्म (खोपोली, आयरनमिट जिम) विजेता ठरला.
स्पर्धा रायगड जिल्हा पॉवरलिफ्टिंगचे कार्याध्यक्ष  यशवंत मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. के. हायस्कूल येथे झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील पेण, खोपोली, माणगाव, उरण, रसायनी या विभागातील जवळजवळ 50 खेळाडूंनी भाग घेतला होता.
स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय पंच आणि आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू देवदत्त भोईर तसेच प्रा. नवनाथ गायकर,  विनायक कारभारी, सुश्मिता देशमुख, निलेश भोईर आणि  रायगडचे राष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू माधव पंडित आणि राज्य खेळाडू राहुल गजरमल यांनी पंच म्हणून काम केले, तर सचिन भालेराव, संदीप पाटकर, शरद रविडोन, विठोबा पालव यांनी व्यवस्था सांभाळली.
स्पर्धेत सांघिक विजेतेपद आयर्न मिट जिम (खोपोली) आणि उपविजेतेपद  बीवायएफसी (खोपोली) यांनी प्राप्त केले. विजेत्यांना आरटीओ विभाग अधिकारी रवींद्र जाधव व अन्य मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे सर्व संचालन  अरुण पाटकर यांनी केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply