Breaking News

मुंबई-पुणे महामार्गावर खड्ड्यांत आदळून पाच वाहनांना अपघात

खालापूर : प्रतिनिधी

खालापूर हद्दीतील हॉटेल बागेश्रीसमोर मुंबई-पुणे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांत आदळून शनिवारी (दि. 23) तब्बल पाच दुचाकी वाहनांना अपघात झाला.

या अपघातात दोनजण जायबंदी झाले असून  त्यांना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर पाच दुचाकीस्वार प्रथमोपचार करून मोडतोड झालेली वाहने दुरुस्तीसाठी गॅरजकडे रवाना झाले.

हॉटेल बागेश्रीसमोर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले की या खड्ड्यांचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. विवेक पिंगळे (वय 30, रा. पनवेल) हे ढेकू औद्योगिक वसाहतीत खाजगी कंपनीत नोकरी करतात. शनिवारी त्यांची दुचाकी हॉटेल बागेश्रीसमोरील खड्ड्यांत आदळली. या अपघातात पिंगळे जखमी झाले.

अशाच प्रकारे हॉटेल बागेश्री परिसरात शनिवारी पाच वाहनांचे अपघात झाले. मागील दिड महिन्यात या परिसरात 25 वाहनचालक जखमी झाले आहेत.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply