Breaking News

नागोठणे विभागात पाणीपुरवठा प्रकरणी आमदार रविशेठ पाटील आक्रमक

नागोठणे : प्रतिनिधी

नागरिकांना योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणामध्ये पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हायगय झाल्यास संबंधीतांची आम्ही गय  करणार नाही, असा इशारा आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी (दि. 22) नागोठणे येथे दिला.

भाजपचे नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी शुक्रवारी नागोठणे येथील शिवगणेश उत्सव मंडळ हॉलमध्ये विभागातील पाणीपुरवठ्या संदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार रविशेठ पाटील मार्गदर्शन करीत होते. नागोठण्यासह विभागामध्ये सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष अपर्णा सुटे, शहराध्यक्षा शितल नांगरे, सिराज पानसरे, सुभाष पाटील, राजू लवटे, संतोष लाड,  मारुती शिर्के, तुकाराम राणे, परशुराम तेलंगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग  पेणचे कोठेकर, नागोठणे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कुंभार, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता गांगुर्डे, सहाय्यक अभियंता आर. आर. म्हात्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी एम. जे. फडतरे, विस्ताराधिकारी एस. एन. गायकवाड, नागोठणे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, प्रमोद गोळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व भागातील नागरिक या बैठकीला उपस्थित होते.

नागोठणे शहर व विभागातील पाणी समस्येबाबत   भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. नऊ ते दहा कोटी खर्च होऊनही नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित का होत नाही, असा  प्रश्न या वेळी विचारला गेला. नागोठणे विभागातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन या वेळी अधिकार्‍यांनी दिले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply