Breaking News

प्रभाग क्रमांक 20 झाला चकाचक

पनवेल ः प्रतिनिधी

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल भारतीय जनता पार्टी आणि पनवेल महापालिकेच्या वतीने महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 20मध्ये स्वच्छता अभियान पार पडले. या अभियानामुळे प्रभाग क्रमांक 20 चकाचक झाला आहे. विशेष म्हणजे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या अभियानात स्वतः उतरून प्रत्यक्ष स्वच्छता केली, तसेच अभियानाच्या अनुषंगाने काही सूचनाही केल्या.

वाढदिवस म्हटले की पुष्पगुच्छ, हारतुरे, भेटवस्तू, शुभेच्छा दिल्या जातात, मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसाला महास्वच्छता अभियान राबवून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजेच गोरगरिबांचे कैवारी, दानशूर कर्ण. अशा उदार व्यक्तिमत्त्वाकडे अनेक सुखसोयी आहेत, पण गरजूंच्या हाकेला धावून जाणे, त्यांना मदत करणे यामध्येच ते नेहमी सुख मानतात. निमित्त काही असो, पण समाजाची सेवा झाली पाहिजे, हा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हट्टाहास असतो आणि समाजोपयोगी उपक्रमात ते प्रत्यक्ष सहभाग घेतात.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाच्या तिसर्‍या दिवशी प्रभाग 20मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समवेत भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक मनोज भुजबळ, माजी नगरसेवक अजय बहिरा, भाजप नेते किशोर मोरे, मनोहर मुंबईकर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply