Breaking News

शिवसेनेचे पेण विधानसभा संघटक बाळा म्हात्रे शिंदे गटात

पेण : प्रतिनिधी

रायगडमधील शिवसेनेचे तीन आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत राहिल्याने रायगडमध्ये शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असतानाच पेण शिवसेनेचे विधानसभा संघटक बाळा म्हात्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अलिबाग राजमळा येथील श्रीराज निवासस्थानी आमदार दळवी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मागील महिन्यात दळवी समर्थकांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले तसेच ठाकरे समर्थकांनी शिवसेना मेळाव्याचे आयोजन केले. मात्र त्यामध्ये पेणचे जिल्हा संघटक बाळा म्हात्रे हे कोणत्याच गटात पाहायला मिळाले नाहीत. परंतु सोमवारी पेण विधानसभा संघटकपदाचा राजीनामा देऊन बाळा म्हात्रे यांनी आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतली. आमदार दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन त्यांना पाठिंबा दर्शवत असल्याचे बाळा म्हात्रे यांनी या वेळी सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply