Breaking News

‘मतदार-आधार’ जोडणी मोहीम 1 ऑगस्टपासून

अलिबाग : प्रतिनिधी

मतदार यादीतील नाव आधार  कार्डसोबत जोडण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे. या मोहिमेची सुरुवात 1 ऑगस्टपासून केली जाणर आहे, अशी माहिती रायगडच्या निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी बुधवारी (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मतदार याद्यांचे प्रमाणीकरण व्हावे, मतदारांची ओळख प्रस्तापित व्हावी, दुबार मतदारांची नावे वगळता यावीत यासाठी मतदार याद्यांना आधार जोडणीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे.

मतदार याद्यांना आधार जोडणीसाठी 6 ब क्रमांकाचे अर्ज जवळच्या मतदान केंद्र, तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. ऑनलाइन पध्दतीनेही हे अर्ज उपलब्ध राहणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर हा अर्ज उपलब्ध असणार आहे. या शिवाय घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे उबाळे यांनी यावेळी सांगितले.

मतदारांना ही नोंदणी आवश्यक असली तरी सक्तीची नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जे मतदार आधार जोडणी करणार नाहीत. त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जाणार नाहीत. त्यांना निवडणूक आयोगाने नमूद केलेल्या ओळखपत्रांच्या सहाय्याने मतदान करता येणार आहे.

मतदार, आधार जोडणीला 1 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. ही जोडणी सक्तीची नाही. तरीदेखील  रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी या मोहिमेचा लाभ घेऊन आपले मतदार यादीतील नाव आधार कार्डाशी जोडून घ्यावे.

-स्नेहा उबाळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी, रायगड

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply