Breaking News

इस्त्राईलच्या राजदूतांनी घेतली पनवेल महापालिका हद्दीतील उपक्रमांची माहिती

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर

पनवेलमधील इस्त्राइली दफनभूमीचा विकास करावा, तसेच त्या अनुषंगाने असणार्‍या विविध विषयांवरती चर्चा करण्यासाठी मंगळवारी (दि. 1) इस्त्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी आणि इस्त्राईल वाणिज्यदूतातील विशेष प्रकल्प अधिकारी अनय जोगळेकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. पनवेलमध्ये अनेक वर्षापासून इस्त्रायली लोकांची वसाहत असून त्यांची दफनभूमी तसेच इतर धार्मिक स्थळे आहेत. त्यांचा विकास महापालिकेने करावा या हेतूने इस्त्रायलचे राजदूत कोबी शोशनी यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी चर्चा केली. या वेळी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रस्तावित विविध उपक्रमांची माहिती आयुक्तांनी शोशांनी यांना दिली.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply