Breaking News

मजरे जांभूळपाड्यात विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

पाली ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील मजरे जांभूळपाडा येथील गावाच्या शेजारी शेतात असलेल्या एका विहिरीत गुरे चारण्यासाठी गेलेला तरुण हातपाय धुण्यासाठी गेला असता तोल गेल्याने 30 ते 35 फूट खोल विहिरीत पडला. केशव रवींद्र मालुसरे (18) असे विहिरीत बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. एका तासानंतर या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात येश आले.

घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस, कोलाड रिव्हर राफ्टिंगचे प्रमुख महेश सानप व त्यांचे सहकारी हरेश सानप, अमित जाधव, रोशन सानप तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणारी गुरुनाथ साठीलकर व सहकारी विजय भोसले अमोल कदम,निलेश कुदळे, अंकुश मोरे, भक्ती साठेलकर, विशाल चव्हाण, विवेक रावळ ही टीम देखील घटनास्थळी पोहचली. विहिरीचा घेरा लहान असल्याने एका तासाने तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. घटनेनंतर पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार, पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी धोकादायक विहिरी व त्यावर उपाययोजना करण्या संदर्भात ग्रामपंचायतीला आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देणार असल्याचे सांगितले.

दरम्यान या अपघाती घटनेनंतर सुधागडातील अन्य उघड़या व धोकादायक विहीरिंचा गंभीर  प्रश्न समोर आला. भविष्यात विहिरीत पडून होणार्‍या अपघाती घटना टाळण्यासाठी व सुरक्षीततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होऊ लागली. यावर चिवे सरपंच अनिता रोहिदास साजेकर यांनी मजरे जांभूळपाडा येथील शेतात उघड्यावर असलेल्या विहिरीला संरक्षण कवच बसविणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply