माजी मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील बंदर रोड येथे असलेल्या रायगड स्पोर्ट्सच्या वतीने स्वातंत्र्य चषक दोनदिवसीय रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (दि. 1) महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रशांत कर्पे, राजू पटेल, सुफीयान पटेल, नबीर शेख यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या संघाला 30 हजार रुपये, उपविजेत्या संघाला 15 हजार रुपये आणि दोन्ही संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.