कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, नादब्रम्ह साधना मंडळ खारघर आणि भाजप पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शुक्रवारी (दि. 5) हा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी 5.15 वाजता भजन स्वरपुष्प कार्यक्रम होणार असून दीपप्रज्वलन कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे, भजनसम्राट ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, उस्ताद अजिम खान, ह. भ. प. नंदकुमार कर्वे, सिडको युनियन सेक्रेटरी जे. टी. पाटील, भाजप खारघर अध्यक्ष ब्रजेश पटेल, वसंतशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर 5.30 वाजता गोवा राज्यातील सुप्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर यांचे शास्त्रीय-उपशास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना हार्मोनियमवर वरद सोहनी, तबला रामदास म्हात्रे, पखवाज मधुकर धोंगडे आणि गुरुदास कदम यांची टाळ साथ असणार आहे. 6.45 वाजता भजनसम्राट ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी आणि नादब्रम्ह साधना मंडळ शिष्य परिवाराच्या गायनाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. त्यानंतर 7 वाजता आयोजकांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभीष्टचिंतन होईल. या सुरेल संगीतमय कार्यक्रमाचा रसिकश्रोत्यांनी लाभ, घ्यावा असे आवाहन संयोजक सुप्रसिद्ध गायक रायगडभूषण उमेश चौधरी यांनी केले आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply