Breaking News

विजय आर्मी स्कूलमध्ये साहसी व क्रीडा प्रशिक्षण

पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील चिखले येथील विजय आर्मी स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे छत्रपती शिवाजी महाराज नॅशनल मेमोरियल ट्रस्ट व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी व क्रीडा प्रशिक्षण संस्था, विजय नाना स्पोर्ट्स अ‍ॅडवेंचर अँड रायफल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने साहसी व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी शाळेचे प्राचार्य एम. के. मराठे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विकास लाटे, रवींद्र पानकडे, अमोल आठवले, सौरभ दराडे, दिपक जगदाळे, समित आव्हाळे तसेच आश्रमशाळा चिखलेचे शिक्षक राजेश राठोड, व्ही. एल. काटकर उपस्थित होते. उपप्राचार्य एस. पी. पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांसोबत शाळेचे कमांडंट पी. व्ही. आर. कृष्णन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सैनिक निर्देशक, संगणक निर्देशक या सर्वांनी विविध साहसी कौशल्याचे प्रशिक्षण घेतले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply