खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 10) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताहाचा दुसरा दिवस स्वच्छता अभियानाने झाला.
या कार्यक्रमासाठी ओवे पेठ येथील शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यासाठी महाविद्यालयातील डी.एल.एल.ई व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी श्रमदान केले.कार्यक्रमाचे आयोजन डी.एल.एल.ई चे प्रमुख प्रा. महेश धायगुडे व राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. प्रथमेश ठाकूर यांनी केले तसेच प्रा. महादेव चव्हाण, प्रा. अंकिता जांगिड, प्रा. सफिना मुकादम, प्रा. प्रतिक्षा पाटील व भाग्यश्री शुक्ला यांनी सहकार्य केले.
हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व उपस्थिती दाखवली. कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.