नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत 5-0 ने बाजी मारल्यानंतर भारतीय संघाला वन डे मालिकेत धक्का बसला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावले. तीन वन डे सामन्यांची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ व्हाईटवॉश टाळण्यासाठी अखेरच्या वन डे सामन्यात खेळणार आहे, मात्र या सामन्यातही भारतीय संघासमोर न्यूझीलंडचे तगडे आव्हान असणार आहे. कारण न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन खांद्याच्या दुखापतीमधून सावरला असून तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
विल्यमसन आता दुखापतीमधून सावरला आहे. तो सध्या आपले वर्कआऊट सेशन चांगले पार पाडतोय. तो खेळण्यासाठी आता सज्ज आहे. आम्ही त्याला अजून काही त्रास जाणवत नाही ना याची तपासणी करू, अशी माहिती न्यूझीलंडच्या मुख्य प्रशिक्षकांनी तिसर्या वन डे सामन्याआधी पत्रकारांशी बोलताना दिली.
तिसर्या वन डेआधी न्यूझीलंडने इश सोधी आणि टिकनर या दोन्ही खेळाडूंना संघात स्थान दिले. न्यूझीलंडच्या संघातील तीन खेळाडू सध्या आजारी आहेत. त्यामुळे अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोधी आणि टिकनरला संघात स्थान दिले. दरम्यान, अखेरचा वन डे सामना जिंकून टी-20 मालिकेतील पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी न्यूझीलंडकडे असणार आहे.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …