Breaking News

लालपरी आता पूर्ण प्रवासी क्षमतेने धावणार

मुंबई : प्रतिनिधी – लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. बंद असलेली एसटी सेवा सध्या सुरु असली तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने सेवा सुरु नाही. मात्र आता राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अटी-शर्थींसह ही परवानगी देण्यात आली आहे.

कर्नाटक आणि गुजरातमध्ये 100 टक्के प्रवासी वाहतूक सुरु केल्याच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून पूर्ण आसनक्षमतेने करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याआधी 20 जुलैला सोशल डिस्टन्सिंग पाळत आसन क्षमतेच्या 50 टक्के आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती.

बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणं बंधनकारक असणार आहे. वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या बसेस निर्जंतूक करुनच मार्गस्थ करण्यात याव्यात. लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या (न) पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे. तथापी पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक सुरु होत असल्याने सर्व आसने पूर्वीप्रणाणे आरक्षणासाठी उपलब्ध करुन द्यावीत. या अटी असणार आहेत.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply