Breaking News

अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

अलिबाग : जिमाका

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75व्या वर्धापनदिनी सोमवारी (दि. 15) जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा नियोजन अधिकारी  जयसिंग मेहत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशेट्टी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम, तहसीलदार विशाल दौंडकर, मीनल दळवी, सचिन शेजाळ, डॉ. सतिश कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी आणि कर्मचारी या वेळी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply