Breaking News

महाड भाजप महिलांची ‘वंदे रॅली’

महाड : प्रतिनिधी

देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना महाड भाजप महिला मोर्चाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला ’वंदे रॅली’ काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीला महाड शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 14) महाडमध्ये ’ वंदे रॅली’ या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांना भारत माता आणि महात्मा गांधींची वेशभूषा करुन तसेच सर्व महिलांनी मोटारसायकलींना तिरंगा लाऊन देशभक्ती गीते म्हणत आणि घोषणा देत महाड शहरात ही रॅली काढली होती. भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी या वंदे रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. जिल्हा चिटणीस डॉ. मंजुषा कुद्रीमोती, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष निलीमा भोसले, शहर अध्यक्षा नमिता दोषी, भाजपचे तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांच्यासह महिला कार्यकर्त्या या वंदे रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पांरपरिक वेशभूषा करून सहभागी झाल्या होत्या.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply