Breaking News

रुग्णाचा मृत्यू; नवी मुंबई पालिका रुग्णालयाची नातेवाइकांकडून तोडफोड

नवी मुंबई : प्रतिनिधी

कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. यात हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण, तर डॉक्टर आणि नर्सना धक्काबुक्की झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी तोडफोड केली. यात रुग्णालयातील व्हेंटिलेटर, डायलिसीसची मशीन, पंखे अशा साहित्याची नासधूस केली तसेच सुरक्षा रक्षकास मारहाण करून डॉक्टर आणि नर्सनाही धक्काबुक्की केली. मारहाण करणार्‍यांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.नवी मुंबई महापालिकेच्या वाशीमधील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 50 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला मंगळवारी सायंकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती, परंतु या चाचणीचा रिपोर्ट आला नव्हता. त्याच्यावर उपचार सुरू होते. रात्री उपचारादरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला. या वेळी संतप्त नातेवाइकांनी आयसोलेशन वॉर्डमध्ये जाऊन राडा घातला. या प्रकरणी वाशी पोलिसांनी यातील चार जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply