Breaking News

नियम पाळून दहिहंडी करा

पोलिसांचे आवाहन; पनवेल, उरणमध्ये बैठक

पनवेल : वार्ताहर

दहिहंडी सण साजरा करताना  नियमाचे पालन करणे  महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल  शिवराज पाटील यांनी बुधवारी (दि. 17) घेतलेल्या सार्वजनिक दहिहंडी आयोजक बैठकीत केले.

दहिहंडी सणानिमित्ताने सार्वजनिक दहिहंडीचे आयोजक यांची पोलीस ठाणे मंथन हॉल येथे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, गोपनीय विभागाचे अंमलदार सचिन होळकर यांच्यासह हद्दीतील दहीहंडी आयोजक, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी मार्गदर्शन करताना पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले की, दहिहंडी उत्सवामध्ये सामील होणा-या गोविंदाचे वय 14 वर्षांपेक्षा कमी नसावे, गोविंदा सशक्त व ताकतवान जवान असावे, दहिहंडी ठिकाणी जनरेटर, फायर फायटर, रूग्णवाहिका व गोविंदा पथकाचा विमा उतरविण्यात यावा, ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी आवाजाची मर्यादा विहीत डेसीबल पेक्षा जास्त नसावी, डीजे/डॉल्बी किंवा इतर कर्कश आवाजाची उपकरणे वापरू नये, तसेच शासनाकडून आलेल्या परिपत्रानुसार दहिहंडी व गणेशोत्सव सणाबाबत  मार्गदर्शन करून त्यांनी आवश्यक त्या सुचना दिल्या.

बैठकीस दहीहंडी मंडळाचे एकूण 51 पदाधिकारी उपस्थित होते, तसेच दहीहंडी मंडळातील आयोजकांना शांतता राखणे कामी मंडळाच्या पदाधिकार्‍यांना फौजदारी प्रक्रिया 149 प्रमाणे नोटीस अदा करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी दिली.

उरण : प्रतिनिधी

उरणमध्ये दहिहंडी व गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शासकीय नियमावलीची माहिती देण्यासाठी उरण पोलिसांनी बैठक आयोजित केली होती.

उरण येथील कोकण ज्ञानपीठ विद्यालयात उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी सार्वजनिक 4 व खाजगी दहिहंडीचे 60 आयोजक, सदस्य तसेच विविध सात गोविंदा पथकाचे अध्यक्ष, सदस्य व गावातील मंडप, साऊंड डेकोरेटर्स, मालक  मिळून 35 आदी शंभराहून अधिक जण सहभागी झाले होते.

या वेळी मार्गदर्शन पोलिसांकडून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले, दहिहंडी व गणेशोत्सव सणाबाबत पोलिसांकडून दिलेल्या सुचना, परिपत्रकानुसार दिलेल्या सुचनांचे पालन करावे आणि दहिहंडी व गणेशोत्सव सण शांतता पुर्ण साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले. या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिजे, पोलीस उपनिरीक्षक गुरव, पोलीस उपनिरीक्षक तुरवाड आदी उपस्थित होते.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply