Breaking News

स्वातंत्र्य दिनानिमित्त पेणमध्ये जलतरणपटूंकडून परिक्रमा

पेण : प्रतिनिधी
येथील मामा वास्कर जलतरण तलाव हौशी जलतरणपटूंनी शहरातील कुंभार तलावात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 परिक्रमा मारून आगळावेगळा स्वातंत्र्य दिन साजरा केला. या उपक्रमात सहा महिला, तर 19 पुरुष अशा एकूण 25 जलतरणपटूंनी सहभाग घेतला. याबद्दल बोलताना पेण पालिकेचा जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय सार्थकी ठरल्याचा अभिमान वाटत असल्याचे नगराध्यक्ष प्रितम पाटील यांनी म्हटले.
या उपक्रमात सहभागी झालेल्या जलतरणपटूंना शुभेच्छा देण्यासाठी नगराध्यक्ष प्रितम पाटील यांच्यासह तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, प्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव, नगरसेविका सपना पाटील, संतोष शृंगारपुरे, माजी सभापती प्रकाश शिंगरुत, युवा नेते ललित पाटील, हितेश पाटील, माजी मुख्याध्यापिका कलावती पाटील, सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे, संजय पाटील, रामभाऊ गोरिवले, बाळा जितकर आदी उपस्थित होते.
या वेळी नगराध्यक्ष प्रितम पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा आगळवेगळा उपक्रम राबवून तो यशस्वी केल्याबाबत सर्व जलतरणपटूंचे अभिनंदन करीत सांगितले की, शहरात मामा वास्कर जलतरण तलाव उभारण्याचा आम्ही घेतलेला निर्णय हा योग्य होता याचा आनंद वाटला. येथील जलतरपटू जिल्हा, राज्याबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन करून नावलौकिक मिळवत आहेत. ज्या तलावात हा उपक्रम राबविला गेला त्याच तलावात मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल.
तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी या उपक्रमात पुरुषांसोबतच महिलांचादेखील सामावेश असल्याने आज येथे महिला-पुरुष समानता दिसून आली असून आपल्या पेण तालुक्यातील अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे पोहचतील यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया, असे सांगितले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक सचिन शिंगरूत, अनिल कनघरे व हिमांशु मलबारी यांनी जलतरणपटूंना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply