Breaking News

पोलादपुरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पोलादपूर : प्रतिनिधी

सुवर्णकार आणि कारागिर संघटनेने सोनार समाजाचे नेतृत्व करून विविध घटकांना प्रोत्साहित करण्यासोबतच स्वत:चे व्यवसायदेखील सचोटीने चालविण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी पोलादपूर येथे केले. सुवर्णकार व कारागिर संघटनेतर्फे पोलादपूर येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पालकर बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि संतशिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. संगिता पालकर-हत्तीमारे यांनी स्पर्धा परिक्षांसंबंधात माहिती दिली. माजी उपसरपंच मंगेश नगरकर, सूर्यकांत नगरकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुप्रीत पालकर, अनुराग पालकर, प्राजक्ता पालकर, कोमल पालकर, आदिती नगरकर या गुणवंत विद्यार्थ्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी सागवेकर यांनी केले. संघटनेचे अध्यक्ष संजय वि. पालकर, सेवानिवृत्त कॅनरा बँक मॅनेजर प्रभाकर पालकर, दापोली कृषी विद्यापिठाचे सेवानिवृत्त अधिकारी सुर्यकांत नगरकर, सामाजिक कार्यकर्ते विजय पालकर, रवींद्र नगरकर यांच्यासह सुवर्णकार समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक पालकर, शेखर पालकर तसेच अन्य पदाधिकार्‍यांनी  प्रयत्न केले. चंद्रकांत नगरकर यांनी आभार मानले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply