Breaking News

डी कॉकने मोडला धोनीचा विक्रम

डब्लिन ः वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने आयर्लंडविरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात 120 धावांची खेळी करीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने यष्टीरक्षक म्हणून सर्वांत कमी वयात ही कामगिरी केली आहे. हा विक्रम पूर्वी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. धोनीने 30 वर्ष आणि 99 दिवस असे वय असताना 10 हजार धावांचा टप्पा गाठला होता, तर डी कॉकचे वय 28 वर्षे व 211 दिवस असे आहे. डी कॉकने 259 डावांत 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने यासाठी 272 डाव खेळले होते. धोनीने 293 डावांत ही कामगिरी केली होती. यासोबतच डी कॉक 16 वन डे शतके ठोकणारा सर्वांत वेगवान यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याने 124 डावांत 16 वन डे शतके ठोकली आहेत. वन डे क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान 16 शतके करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलाच्या नावावर आहे. आमलाने हा पराक्रम अवघ्या 94 डावांत केला होता.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply