कलबुर्गी : वृत्तसंस्था
ऑल इंडिया मजलिस- ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
15 कोटी आहोत, पण 100 कोटींना भारी आहोत, असे धार्मिक तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य वारिस पठाण यांनी 15 फेब्रुवारी रोजी एका जाहीर सभेत केले होते. पठाण यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यावर पठाण यांचे वक्तव्य चुकीचेच असून, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. संबंधितांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
शिरच्छेद करणार्याला 11 लाखांचे इनाम
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी एमआयएमचे वारिस पठाण यांचा शिरच्छेद करा. ही कृती करणार्याला आम्ही 11 लाखांचे इनाम देऊ, अशी घोषणा हक-ए-हिंदुस्थान मोर्चाने केली आहे. पठाण हे देशद्रोही असल्याचेही या संघटनेच्या तमन्ना हाश्मी यांनी म्हटले आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …