Breaking News

मोदी सरकारच्या माध्यमातून देशातील गोरगरीबांचे कल्याण – केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल

महाड, प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ गोरगरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवित आहेत. देशातील नागरिकांना अन्न-पाणी पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असतानाही आज पंतप्रधान मोदी केंद्राच्या माध्यमातून मोठा वाटा उचलत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि जलशक्तीमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी सोमवारी (दि. 22) केले. रायगड लोकसभा प्रवास कार्यक्रमादरम्यान महाड येथे आयोजित लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस अविनाश कोळी, उपाध्यक्ष राजेश मपारा, मिलिंद पाटील, बिपीन महामुणकर, महाड तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, पोलादपूर तालुकाध्यक्ष प्रसन्ना पालांडे, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मानसी मानकर, नीलिमा भोसले, मंजुषा कुद्रुमूती आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लाभार्थी मेळाव्याला मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी एकेकाळी प्रगत व देशात नंबर एक असलेल्या महाराष्ट्राची प्रगती का मंदावली, असा टोला आधीच्या आघाडी सरकारला लगावला.
या वेळी पदाधिकार्‍यांनी आपले विचार मांडले, तर लाभार्थ्यांनीदेखील भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला धन्यवाद दिले.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply