Breaking News

गणपती बाप्पांचा नैवेद्यही महागणार!

भाज्यांचे दर चढेच; सामान्यांच्या खिशाला कात्री

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

श्रावण महिना सुरू होण्याआधीपासूनच वाढलेले भाज्यांचे दर उतरण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यात आता गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी भाज्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे भाज्यांचे दर आणखी चढे राहणार असल्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. घाऊक बाजारातच भाज्या महागल्याने किरकोळ बाजारात हेच दर 80 ते 100 रुपये किलोच्या घरात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

यावर्षी उन्हाळ्यापासूनच भाज्यांचे दर चढे राहिले आहेत. त्यानंतर अति पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले. त्यामुळे मुंबईत पोहचणारी भाजी खराब होत होती, तसेच भाज्यांचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे बाजारात भाज्यांचे दर चढेच राहिले. दरवर्षी श्रावणात भाज्या स्वस्त होतात. यंदा मात्र ग्राहकांना चढ्या भावानेच भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. गणेशोत्सव काळातही महागच भाज्या खरेदी कराव्या लागणार आहेत, अशी शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.

दररोज हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यानुसार बाजारात ज्वाला मिरची, लवंगी मिरचीला जास्त मागणी असते. मात्र घाऊक बाजारात सध्या मिरचीचे दर 40 ते 60 रुपये किलो आहेत, तर किरकोळ बाजारात 80 ते 90 रुपये किलो आहे. गेल्या आठवड्यापर्यंत कोथिंबिरीची एक जुडी घाऊक बाजारात 8 ते 10 रुपये होती. किरकोळ बाजारात ही जुडी 20 रुपयांपर्यंत मिळत होती. मात्र घाऊक बाजारातच कोथिंबीर जुडी 25 ते 30 रुपये झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबिरीची जुडी 40 ते 50 रुपये झाली आहे.

भाज्यांचे घाऊक दर

भेंडी 35 ते 50 रुपये

चवळी 40 ते 60 रुपये

फरसबी 50 ते 80 रुपये

फ्लॉवर 15 ते 30 रुपये

गवार 55 ते 75 रुपये

घेवडा 40 ते 60 रुपये

ढोबळी मिरची 40 ते 45 रुपये

शेवगा 40 ते 50 रुपये

तोंडली 50 ते 70 रुपये

वाटाणा 70 ते 100 रुपये

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply