Breaking News

सीकेटी महाविद्यालयात कर्करोगविषयी व्याख्यान

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व टाटा मेमोरिअल सेंटरचे कॅन्सर रिसर्च इंस्टीटयूट यांच्या समन्वयाने तंबाखूसंबंधी कर्करोगविषयी जागृतीपर अतिथी व्याख्यान शुक्रवारी (दि. 26) झाले.

या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे टाटा मेमोरिअल सेंटरचे कॅन्सर रिसर्च इंस्टीटयूटच्या वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुवर्णा गोरे, शैक्षणिक आणि प्रकल्प कक्षाच्या प्रभारी डॉ. ओजस्विनी उपासनी तसेच वैज्ञानिक अधिकारी डॉ. ज्योती कोडे उपस्थित होते. या व्याखानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, कॅन्सर रिसर्च इंस्टीट्यूटचे संशोधक विद्यार्थी व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सर्व शिक्षक कर्मचारी तसेच 201 विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची प्रस्तावना सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एन. सी. वडनेरे यांनी केली. प्रमुख पाहुण्या डॉ. सुवर्णा गोरे यांनी तंबाखूसंबंधी कर्करोगविषयी जनजागृती आणि त्याची कारणे या विषयावर व्याख्यान दिले. त्यानंतर ते कसे टाळावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच एसीटीआरईसी केंद्रात तंबाखूचे व्यसन असलेल्या व्यक्तीला समुपदेशन कसे देतात याबाबतची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले. प्रा. एन. पी. तिदार यांनी या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. प्रस्तुत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply