Breaking News

कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना शनिवारपासून टोलमाफीची सवलत

पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. 27)पासून करण्यात येत आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
या टोलमाफी सवलतीसाठी गणेशोत्सव 2022, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरूपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करून द्यावेत. हाच पास परतीच्या प्रवासासाठीदेखील ग्राह्य धरण्यात येईल. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्यादेखील सूचना आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply