पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 पटकाविला. त्याचबरोबर हा बहुमान मिळवणारे ते रायगड, नवी मुंबईतील एकमेव विद्यालय ठरले आहे. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे यांनी शुक्रवारी (दि. 26) या विद्यालयाला सदिच्छा भेट देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच शिक्षकवर्गाचे भरभरून कौतुक केले.
या वेळी रयत शिक्षण संस्थेच्या पुणे विभागाचे सहाय्यक अधिकारी शंकर पवार, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, रायगड विभाग पीआरओ बाळासाहेब कारंडे, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या राज अलोनी, वास्तुविशारद श्री. पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आमदार चेतन तुपे, पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे तसेच इतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ व लोकनेता पुस्तक देऊन स्वागत केले.
Check Also
खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …
RamPrahar – The Panvel Daily Paper