Breaking News

देशाच्या सरन्यायाधीशपदी उदय लळीत यांनी शपथ घेतली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
न्यायमूर्ती उदय उमेश लळीत भारताचे 49वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शनिवारी (दि. 27) सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कोकणातील विजयदुर्गजवळ असलेले गिर्ये हे उदय लळीत यांचे मूळ गाव आहे, तर त्यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1957 रोजी सोलापूरमध्ये झाला. त्यांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे. लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होणार आहेत. या दरम्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह इतर महत्त्वांच्या प्रकरणांचा निकाल लागणार का याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Check Also

नमो चषक स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत शानदार सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्तशिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्त्वाची अशी …

Leave a Reply