Breaking News

सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड पोलीस दलाला प्रथम क्रमांक

अलिबाग : प्रतिनिधी

क्राईम एंड  क्रिमिनल नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) कार्यप्रणालीमध्ये रायगड पोलीस दलाने राज्यात  प्रथम क्रमांक मिळवून आपला दबदबा कायम राखला आहे. पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मासिक कामगिरी अहवाल घेण्यात येतो. मागील काही महिन्यात रायगड जिल्ह्याने सातत्यपुर्ण चांगली कामगिरी करीत दरमहा प्रथम पाचमध्ये स्थान प्राप्त केले होते. तद्नंतर सीसीटीएनएस कामकाजामध्ये आणखी सुधारणा करीत मे 2022 मध्ये प्रथम क्रमांक, माहे जुन 2022 मध्ये व्दितीय क्रमांक व जुलै 2022 मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 2022 मध्ये पुन्हा एकदा 232 गुणांपैकी 225 गुण प्राप्त करून एकूण 97 टक्के गुणांसह राज्याच्या गुणांकनात प्रथम क्रमांक प्राप्त केला. रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे स्थापित सीसीटीएनएस कक्ष व पोलीस ठाण्यातील नियुक्त प्रशिक्षीत पोलीस अंमलदार यांनी ही कामगिरी केली आहे. रायगड जिल्ह्याने पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे, अहवाल यांची सीसीटीएनएसमधील फॉर्मची तत्काळ नोंदणी, सिटीझन पोर्टलवरील प्राप्त तक्रारींची तत्काळ निर्गती, सीसीटीएनएस प्रणालीचा वापर करून करण्यात येणारे गुन्हे प्रकटीकरण, प्रतिबंधक कारवाई यामध्ये विशेष कामकाज करीत यश प्राप्त केले आहे.

अटक होणार्‍या गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात सीसीटीएनएस प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत असून सदरचे सातत्य कायम ठेवत यापुढेही रायगड जिल्हा अग्रस्थानी ठेवण्याकरीता प्रयत्नशिल राहील.

-अशोक दुधे, पोलीस अधीक्षक, रायगड

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply