Breaking News

कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना ‘जलसंजीवनी’

कर्जत : प्रतिनिधी

युनायटेड वे ऑफ मुंबई संस्थेच्या वतीने कर्जत तालुक्यातील खांडस, अंभेरपाडा, नांदगाव या तीन ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये जलसंजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आला. ग्रामपंचायत खांडस व नांदगाव येथे ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जलसंजीवनी प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रदीप क्षीरसागर, उपव्यवस्थापक एम. एस कांबळे, समूह संघटक विवेक कोळी, कृषी तज्ज्ञ जोएब दाऊदी व समूह सहायक संतोष काटे आदी उपस्थित होते. ग्रामसभेमध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या सर्व कामांची माहिती देण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले. प्रामुख्याने मृदा व जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, पाणी ताळेबंद, क्षमता बांधणी व जनजागृती, हवामान अनुकूल शेती व शेतीपूरक व्यवसाय या घटकांची माहिती देण्यात आली. तसेच तुषार सिंचन पद्धतीची शास्त्रीय माहिती देण्यात आली असून गरजू शेतकर्‍यांना  संच वाटप करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. खांडस गावातील सरपंच मंगल ऐनकर, उपसरपंच अंकुश ऐनकर, ग्रामसेवक एम. ए. कुटे, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ  तसेच नांदगाव  येथील ग्रामसभेला सरपंच उपसरपंच, ग्रामसेविका, प्रगतीशील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply