सांगली : प्रतिनिधी
विटा येथील यशोधन बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष तथा मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमनपदी भूपेंद्र बाबुराव बारसिंग यांच्या हस्ते या वेळी वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमावेळी दत्तात्रय बारसिंग, शशिकांत बारसिंग, महादेव बारसिंग, तुकाराम झेडे, कुंडलिक बारसिंग सिद्धार्थ बारसिंग, शामराव बारसिंग आदी उपस्थित होते.
यशोधन भूपेंद्र बारसिंग सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे असे व्यक्तीमत्व आहे. आरोग्य शिबिर, छत्रीवाटप, महिला बचत गटासाठी विविध उपक्रम, स्वच्छता अभियान, महापुरुषांची जयंती असे अनेक कार्यक्रम या संस्थेच्या वतीने अध्यक्ष भूपेंद्र बारसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच राबविण्यात येतात.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …