Breaking News

कामोठ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी-शिक्षक दिन उत्साहात साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती. त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपल्या शिक्षकांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी-शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यामध्ये इ. 10वीच्या विद्यार्थ्यांनी इतर वर्गात प्रत्यक्ष अध्यापन केले. विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून देताना या विद्यार्थ्यांनी विविध अध्यापन पद्धतींचा वापर केला, तसेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापनदेखील केले. या वेळी मुख्याध्यापक म्हणून यश तुपे आणि उप मुख्याध्यापक म्हणून सृष्टी अनुसे या विद्यार्थ्यांसोबत 10वीमधील 50 विद्यार्थ्यांनी शिक्षक कामकाजात सहभाग घेतला. दुपारनंतर शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. टी. चाळके यांनी डॉ. राधाकृष्णन् सर्वपल्ली यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. आकांक्षा जिंकूला, पल्लवी यमगर, संजीवनी पवार या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांच्या भूमिकेत असताना आलेला प्रत्यक्ष अनुभव सांगितला आणि शिक्षकांचे महत्त्व पटवून दिले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन एस. डी. थोरात, एस. डी. पाटील, अनिल पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. एन. मोरे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply