अलिबाग : रामप्रहर वृत्त
निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे नुकत्याच संकुल स्तरीय टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात झाल्या. या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यालय व्यवस्थापन समिती तसेच विद्यालय सल्लागार समितीचे सदस्य माजी सदस्य तुकाराम सुतार तसेच जवाहर नवोदय विदयालयाचे पालक शिक्षक संघाचे सदस्य नितीन बडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी विविध विषयांच्या प्रदर्शनाच्या परीक्षकांच्या भूमिकेत डॉ. संजय खोब्रागडे, श्रीमती रुपाली खडतर, डॉ.विनोद कदम, एम. एन. बरुळे, राजेश धबाले हे उपस्थित होते. याशिवाय टेबल टेनिस स्पर्धा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशन मुंबईचे प्रतिनिधी पराग अकोलेकर उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.एपीजे. अब्दुल कलाम आणि महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
टेबल टेनिस स्पर्धा तीन गटात पार पडल्या. यामध्ये 14 वर्षे मुली प्रथम समृद्धी कलकुटे-बीड, द्वितीय श्रृती काळे-रायगड, तृतीय रितीका फापळ- बीड, 14 वर्षे मुले प्रथम अथर्व घुले-उस्मानाबाद, द्वितीय रामकृष्ण पांडे-बीड, तृतीय मनोमय गायकवाड-रायगड, 17 वर्षे मुली प्रथम आरती बनसोडे-बीड, द्वितीय प्रांजली पाटोळे-रायगड, तृतीय संजना चौगुले-उस्मानाबाद,17 वर्षे मुले प्रथम आदर्श मसुटे- सोलापूर, द्वितीय पियुष कोरडे-रायगड, तृतीय ऋषी कांदे-बीड, 19 वर्षे मुली प्रथम साक्षी पाटील-रायगड, द्वितीय विदिशा गोटे-रायगड, तृतीय सहेली दिवेकर-रायगड, 19 वर्षे मुले प्रथम अथर्व जठारी-रायगड, द्वितीय सचिन म्हात्रे-रायगड, तृतीय प्रतिक शिंदे -रायगड यांनी पटकावला.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …