अलिबाग : प्रतिनिधी
रायगडची अपर्णा गायकवाड हिची 19 वर्षांखालील महाराष्ट्र मुलींच्या तर सिद्धार्थ म्हात्रे याची सराव सामान्यांसाठी महाराष्ट्र पुरुष क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.
2024ला होणार्या 19 वर्षांखालील टी-20 महिला विश्वचषकासाठी तयारीचा भाग म्हणून, राज्यांतर्गत होणार्या सराव सामन्यांसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची अपर्णा गायकवाड हिची महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील मुलींच्या टी-20 संघात निवड करण्यात आली आहे. हे सराव सामने अहमदाबाद येथे खेळण्यात येणार आहेत.
मुस्ताक अली करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवडण्याकरीता पुणे येथे होणार्या अंतिम निवड चाचणी सामन्यांसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू सिद्धार्थ म्हात्रे याची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल या दोन्ही खेळाडूंचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, कार्याध्यक्ष प्रदीप नाईक तसेच सर्व सदस्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन जिल्ह्यातील क्रिकेट करता घेत असलेल्या प्रयत्नांबद्दल जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper