Breaking News

नागोठणे केंद्रातील राजिपच्या सहा शाळा अंधारात

नागोठणे : राज वैशंपायन

नागोठणे केंद्रात रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे 18 प्राथमिक शाळा येत असून त्यापैकी सहा शाळा गेली अनेक वर्षे अंधारात आहेत. तर उर्वरित शाळांचे वीजबिल शिक्षक भरीत आहेत.

रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे केंद्राअंतर्गत 18 प्राथमिक शाळा येत असून त्यामध्ये एकूण 432 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. मात्र यातील तब्बल सहा शाळा अंधारात आहेत. त्यापैकी नागोठणे शाळा क्रमांक 1, निडी आणि पिंपळवाडी या तीन शाळांचे वीजबिल हे थकीत आहे. जोगेश्वरीनगर-नागोठणे, शेतपळस, वासगाव या तीन शाळांचे वीजबिल जिल्हा परिषदेमार्फत भरण्यात आले आहे. तर सादिलच्या चार टक्के अनुदानातून (जे शिक्षकांना शालेय खर्चासाठी येतात) पळस येथील शाळेचे वीजबिल भरले जाते. नागोठणे शाळा क्र.1, नागोठणे कन्या शाळा, मिरनगर उर्दू शाळा, निडी शाळा यांचा वीज भरणा लोकवर्गणीतून करण्यात येतो तर लोकवर्गणी व व्यवस्थापन समिती मार्फत नागोठणे उर्दू शाळेचे वीजबिल भरले जाते. मुरवाडी आणि वाघळी येथील प्राथमिक शाळांचे वीजबिल तेथील शाळा व्यवस्थापन समिती भरते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आदिवासी बहुल भागातील एकलघर, लावेचीवाडी आणि भापक्याचीवाडी येथील प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या आहेत, मात्र या शाळांत वीजमिटरही नाहीत.

शालेय खर्चासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येक शाळेला सादिल रक्कम देण्यात येते. त्यातून वीजबिल भरणे अपेक्षित आहे, मात्र  नागोठणे केंद्रातील शाळांना अद्याप सादिल रक्कम अदा करण्यात आली नसून, तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती मिळते. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

सध्या मी पुण्याला ट्रेनिंगकरीता आले आहे. याबाबत माझ्या अधिकार्‍यांना वस्तूस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. तो प्राप्त झाल्यानंतर अपेक्षित निर्णय घेता येईल. -पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद रायगड

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply