कर्जत ़: प्रतिनिधी
कर्तव्य सामाजिक संस्था आणि भीमराज युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथील माध्यमिक विद्यालयात मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ परिसरातील विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी बांधवांनी घेतला. सरपंच राजेंद्र गंगावणे व उपसरपंच साजिद कर्णेकर, कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, संस्थेचे अध्यक्ष विशाल माळी, अॅड. कैलास मोरे, दीपक मोरे, हरिश्चंद्र यादव, सुनील गायकवाड, अनिल गवळे, संतोष माळी, अनंता माळी, प्रमोद माळी, गोविंद माळी, रोहिदास माळी यांच्यासह सेंट्रल हॉस्पिटलचे कर्मचारी, भीमराज युवा संघटना व कर्तव्य सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.