पनवेल : प्रतिनिधी
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये आदर्श समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने शनिवारी महाविद्यालयात मोफत बीएड् व एमएड्, सीईटी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
शनिवार 11 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या बीएड् व एमएड्, सीईटी कार्यशाळेत प्रथम सत्रात विविध विषयांवर विद्यार्थ्यांना प्रा. विजय मोरे आणि विनायक लोहार यांनी सखोल मार्गदर्शन केले, तर द्वितीय सत्रात मागील वर्षात सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी विद्यार्थ्यांना अनेक क्लृप्त्या सांगत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी बीएड्चे 45, तर एमएड्चे 25 विद्यार्थी उपस्थित होते. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे रविवार (दि. 12 मे) आणि शनिवार (दि. 18 मे) या दोन दिवशी देखील अशा प्रकारच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे. तरी सर्वांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी केले आहे.