Breaking News

पनवेलमधील साई वर्ल्ड सिटी प्रकल्प पूर्ण

मान्यवरांच्या उपस्थितीत 800 रहिवाशांना चावी सुपूर्द

पनवेल : प्रतिनिधी

पॅराडाईज ग्रुप साई वर्ल्ड सिटी फेज ’वन’च्या यशस्वी पूर्ततेनंतर 800 भाग्यवान रहिवाशांसाठी चावी-हँडओव्हर समारंभाला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत व लोकनेते रामशेठ ठाकुर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 6) उपस्थित राहून  पॅराडाइज ग्रुपचे संस्थापक तथा साईभक्त मनीष भातिजा यांना शुभेच्छा दिल्या.

पॅराडाईज ग्रुप साई वर्ल्ड सिटी फेज ’वन’च्या यशस्वी पूर्ततेनंतर 800 भाग्यवान रहिवाशांसाठी चावी-हँडओव्हर समारंभ साजरा करण्यासाठी दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन पळस्पे फाटा येथील टुमदार उभ्या राहिलेल्या साई वर्ल्ड सिटीमध्ये 5 आणि 6 नोव्हेंबर 2022 रोजी  करण्यात आले होते.  या वेळी राजकीय, सांस्कृतिक, शासकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मनीष भातिजा यांना शुभेच्छा दिल्या. पनवेलमध्ये पळस्पे फाटा येथे 32 एकर जागेत मेगा टाउनशिपचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा करण्यात आली. साई वर्ल्ड सिटीमधील अत्याधुनिक पद्धती, नवीन जनरेशन आणि कौटुंबिक जीवन यांचे जग भ्रमंतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प बनविला असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

पॅराडाइज ग्रुपच्या माध्यमातून हस्तांतरण करण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये 800 कॉस्मो-लक्झरी घरे सुपूर्द करण्यात आली. तसेच पॅराडाईज ग्रुपने जगप्रसिद्ध असलेली 7 आश्चर्ये या प्रकल्पामध्ये समाविष्ट  करण्यात आली आहेत. या वेळी पॅराडाइज ग्रुपचे संस्थापक मनीष भातीजा यांनी बोलताना सांगितले की, पॅराडाइज ग्रुपमध्ये जीवन हे नेहमीच एक भव्य उत्सवासारखे असते. कारण प्रत्येकाला आनंद आणि आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम कारणे मिळणे गरजेचे आहे. याच नागरिकांच्या मनाला आनंद देणार्‍या भावनेला पॅराडाईज ग्रुपने सत्यात उतरविले आहे

या वेळी आलेल्या पाहुण्यांसाठी खास रशियातील कलाकार आणि मुंबईतील प्रतिष्ठित कंपनीच्या कलाकारांना पाचारण करून मनोरंजनाचा खजिनाच ठेवला. जागतिक जीवनशैलीचे मूर्त स्वरूप असलेल्या साई वर्ल्ड सिटीमध्ये विस्तृत हिरवे क्षेत्र, थीम असलेली लँडस्केपिंग आणि थीम असलेल्या जगात सुशोभित केलेल्या आरोग्य, मनोरंजन आणि विश्रांतीच्या जीवनशैलीच्या सुविधांसह समृद्ध क्लब जीवन याठिकाणी उभारण्यात आले आहे. पॅराडाईज ग्रुपच्या साई वर्ल्ड सिटीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याबद्दल मोठ्या दिमाखात साजरा जरी झाला असला तरी त्याच्या भव्य यशाची नोंद करण्यासाठी साई वर्ल्ड सिटी नवी मुंबईतील सर्वांत मोठा ‘पॅराडाईज वर्ल्ड कार्निव्हल’ अशी होईल.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply