पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेने व्यवसाय परवाना धोरण जाहीर केले आहे. हे धोरण काय आहे याची माहिती महापालिका क्षेत्रातील व्यापार्यांना व्हावी यासाठी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये मंगळवारी (दि. 15) बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, एकनाथ गायकवाड, डॉ. अरुणकुमार भगत, नरेश ठाकूर, विकास घरत, मुकीद काझी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, महापालिका उपायुक्त गणेश शेट्टे, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली व्यापारी सेलचे कमल कोठारी, नारायण ठाकूर, नितीन मुनोथ यांच्यासह पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते. या वेळी पनवेल महापालिकेच्या नवीन व्यवसाय परवाना धोरणासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच हे धोरण काय आहे याची माहिती व्यापार्यांना देण्यात आली.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper