पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये आगामी काळात होणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी पडली असून दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतिश पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजी व संतापावर आता शेकाप नेते काशिनाथ पाटील यांनी उत्तर दिले आहे. सतिश पाटील हा वेडा माणूस असून त्याने आपली औकात काय आहे हे समजून घेतले पाहिजे, अशी जळजळीत टीका पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.
कळंबोली येथे नुकताच आयोजित शरद युवा संवाद कार्यक्रमात बोलताना माजी नगरसेवक सतीश पाटील यांनी, शेतकरी कामगार पक्षाला कोकण शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेतली, मात्र याच शेकापचे नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पात्रता काढतात, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती तसेच आमच्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले होते.
सतिश पाटील यांच्या विधानांसंदर्भात शेकाप नेते काशिनाथ पाटील यांना एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने विचारले असता ते म्हणाले, सतिश पाटील हा वेडा माणूस असून त्याने आपली औकात काय आहे हे समजून घेतले पाहिजे, अशा शब्दांत उत्तर दिले. दरम्यान, पनवेल अर्बन बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या विद्या चव्हाण या उमेदवाराला बदलण्याची अटच शेकापकडून राष्ट्रवादीला घालण्यात आली होती, असे समोर आले आहे. सर्व वाद पाहता आगामी काळात भडका उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …