Breaking News

माजी मंत्री महादेव जानकर यांची ढेबेवाडी, ठाकूरवाडीला भेट

खालापूर : प्रतिनिधी

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी नुकतीच सुधागड तालुक्यातील दर्यागाव आसानी ठाकूरवाडीला भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाऊन घेतल्या. माजी मंत्री आमदार महादेव जानकर हे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून त्यांनी दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवर जाऊन आदिवासी, धनगर, ठाकूर समाज बांधवांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खालापूर तालुक्यातील ढेबेवाडीला भेट देऊन आमदार जानकरांनी तेथील ग्रामस्थांच्याही व्यथा जाणून घेतल्या. त्यासाठी आमदार जानकर शिरवलीपासून ढेबेवाडीपर्यंत चालत गेले. तेथील ढेबे कुटुंबाकडे दोन दिवस वस्तीला राहून रस्त्याची व पाण्याची समस्या जाणून घेतली. तर गारमाळ, जांभिवली, वावोशी, परखंडे, गोरठण, हेमडी या गावांनाही त्यांनी भेट दिली. रासपचे कोकण प्रदेश अध्यक्ष भगवान ढेबे, कोकण नेते श्रीकांत भोईर, उत्तर रायगड अध्यक्ष संपतराव ढेबे, रायगड संपर्क प्रमुख संंतोष ढवळे-धनवीकर, रायगड महिला आघाडी अध्यक्षा मनिषाताई ठाकूर, गजानन चंदने, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत, उमेश पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply