अलिबाग : रामप्रहर वृत्त
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 व 2 पुणे येथे 71वी अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर पुरुष शरीर सौष्ठव अंतिम निवड चाचणी झाली. या स्पर्धेमध्ये रायगड पोलीस दलातील पोलीस नाईक राजेंद्र चंद्रकांत गाणार यांनी कांस्यपदक पटकाविले.
त्याच्रपमाणे विजयदुर्ग, सिंधुदुर्ग येथे चौथी सी/चॅनेल स्विमिंग स्पर्धा झाली. त्यामध्ये रायगड पोलीस दलातील पोलीस नाईक अमित वासुदेव पाटील यांनी कांस्यपदक मिळविले आहे. रायगड पोलीस दलातर्फे दोन्ही खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Check Also
रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …
RamPrahar – The Panvel Daily Paper