Saturday , December 3 2022

‘अशिक्षित ग्राहक, ज्येष्ठ होतात सायबर गुन्ह्यांचे शिकार’

कर्जत : प्रतिनिधी

मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरमुळे हे सायबर गुन्हे होत असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम वापरामुळे आपण सायबर गुन्ह्यांमध्ये अडकत जातो आणि बदनामी टाळण्यासाठी तरुणवर्ग आत्महत्या करण्यास मागेपुढे पहात नाही. एटीएम कार्डमुळेही फसवणूक होते. अशिक्षित ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक याचे बळी ठरतात, असे प्रतिपादन कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी येथे केले.

कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय, आयपीए-एमएसबी, आयपीए रायगड स्थानिक शाखा आणि तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाचे उद्घाटन कर्जतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 112 नंबरवर कॉल केल्यास अर्ध्या तासाच्या आत पोलीस येतात, मात्र त्यांना खोटी माहिती देऊ नका, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.

प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या चढत्या आलेखाची माहिती दिली. नवी मुंबईतील जीवन समर्थक इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सचे डॉ. दीपक दळवी यांनी सीपीआर आणि प्रथमोपचार प्रशिक्षण या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने प्रात्यक्षिके सादर केली.

प्रा. तनिष्का ठाकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एमएसपीसीचे कार्यकारिणी सदस्य नितीन मणियार, संस्थेचे खजिनदार प्रदीपचंद्र शृंगारपुरे, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय मांडे, केमिस्ट असोसिएशनचे मुंबई विभागाचे खजिनदार दिनेश सोळंकी, कर्जत तालुका अध्यक्ष शेखर बोराडे, डॉ. भरत टेकाडे, डॉ. अमोल चांदेकर, प्रा. बबन थावकर, प्रा. प्रीतम जुवाटकर, प्रा. निलोफर खान, प्रा. रुपाली येवले, प्रा. अनिकेत इंदुलकर आदींसह विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply