Breaking News

रेसलिंग रिंगमध्येच कुस्तीपटू सिल्वर किंगचा मृत्यू

लंडन : वृत्तसंस्था

सिल्वर किंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या कुस्तीपटूचा रेसलिंग मॅचदरम्यान मृत्यू झाला. लंडनमध्ये सामना सुरू असताना रेसलिंग रिंगमध्येच हार्टअटॅकमुळे त्याची अखेर झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सिल्वर किंग निपचित पडलेला असताना प्रेक्षकांना हा कार्यक्रमाचाच एक भाग वाटला.

51 वर्षीय कुस्तीपटू सिझर बॅरन हा सिल्वर किंग नावाने प्रसिद्ध आहे. शनिवारी संध्याकाळी तो लुशा लिब्र रेसलिंग शोमध्ये सहभागी झाला होता. 2005 मधील एका हॉलिवूडपटात साकारलेल्या खलनायिकाची व्यक्तिरेखा वठवत तो कुस्ती खेळत होता.

सामना सुरू असतानाच त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याचं म्हटलं जात आहे. प्रेक्षकांना हा कार्यक्रमाचाच एक भाग असल्याचं वाटलं आणि काही काळ त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही, परंतु काहीतरी गंभीर घडल्याची जाणीव होताच वैद्यकीय मदत बोलावण्यात आली.दरम्यान, पोलिसांनी हा मृत्यू संशयित नसल्याचं म्हटलं आहे, मात्र सिल्वर किंगचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. जगभरातून रेसलिंग समित्यांनी सिल्वर किंगच्या निधनाबद्दल शोकसंदेश पाठवला आहे. याबाबत अधिक चौकशी करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply