Breaking News

रस्त्यावर पडलेले झाड उचलले

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमधील अमरधाम ते वीर सावरकर चौक रस्त्यालगत असलेले जुने सुकलेले झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने विद्युत वाहिन्या तुटल्या होत्या. यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता, तसेच झाड रस्त्यावर पडल्यामुळे रहदारीसाठी अडथळा निर्माण झाला होता. नगरसेवक विक्रांत पाटील यांनी लगेच महावितरण आणि वृक्ष प्राधिकरण अधिकार्‍यांशी संपर्क साधून रस्त्यावर पडलेले झाडे उचलून घेण्यास सांगितले.

त्यानुसार विद्युत वाहिन्या जोडण्याचे काम युद्ध पातळीवर करून विद्युत पुरवठा सुरळीत करून घेण्यात आला. नगरसेवक विक्रांत पाटील लॉकडाऊनच्या काळातसुद्धा नागरिकांच्या समस्यांचे निरसन तत्परतेने करतात, याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply